लक्ष्मी दहिवडी येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

 

महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम: संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे यांची माहिती

लक्ष्मी दहिवडी: प्रमोद बनसोडे 

थोर समाजसुधारक, विचारवंत क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या १९८ जयंतीनिमित्त होम मिनिस्टर सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे यांनी दिली.

     शुक्रवार दि. ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा होणार आहे. यादरम्यान विविध सामाजिक विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार तसेच वृक्ष संवर्धन समितीचा सत्कार समारंभ होणार आहे.

  शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्यदिव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असुन या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना अनुक्रमे रोख स्वरूपात बक्षिस देण्यात येणार आहे.

शनिवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सायं. ६ वाजता "होम मिनिस्टर" कार्यक्रम आयोजित केला असुन या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून रोहित गुरव हे निवेदन करणार आहेत. होम मिनिस्टर मध्ये विजयी स्पर्धकाला प्रथम बक्षीस येवला पैठणी, द्वितीय बक्षीस सोन्याची नथ, तृतीय टेबल फॅन, चतुर्थ डिनर सेट बक्षीस देण्यात येणार असुन याशिवाय होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक असे बक्षीस देण्यात येणार आहे.

रविवार दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सायं. ६ वाजता भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे.

शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याची भव्यदिव्य नाशिक ढोल वाद्यासह मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  महात्मा फुले युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामध्ये पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.