सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, सांगोला शैक्षणिक संस्थेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांचे हस्ते ७९ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस सांगोला अंतर्गत फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, इंजिनिअरिंग काॅलेज, पाॅलिटेक्निक काॅलेज, फार्मसी काॅलेज या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले तर अनके विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर भाषणातून देशप्रेम भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. यादरम्यान पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
स्व. आमदार डाॅ. गणपतराव देशमुख यांच्या ९८ जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेतील विजय संपादन स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
भारताच्या ७९ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, इस्टेट डायरेक्टर डाॅ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्यारणी क्षीरसागर, पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य तानाजी बुरूंगले, फार्मसीचे प्राचार्य डाॅ. संजय बैस, पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिकंदर पाटील आदींसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका किरण कोडग यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षिका मनिषा शिंदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.