सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मध्ये सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत "रेविट साॅफ्टवेअर ट्रेनिंग" चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मध्ये सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम चे उद्घाटन करण्यात आले.
हा कार्यक्रम १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२५ या पाच दिवसीय कालावधीत होणार आहे. यामध्ये कॅडडेक्स पुणे फाऊंडर, प्रियांका गित्ते या मार्गदर्शन करणार आहेत.
फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये सोमवार दिनांक १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या रेविट साॅफ्टवेअर ट्रेनिंगचे उद्घाटन प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्यारणी क्षीरसागर, व्याख्यात्या प्रियांका गित्ते, संस्थेच्या व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी, प्रा. धनंजय शिवपुजे, प्रा. सचिन शेंडगे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दरम्यान व्याख्याता प्रियांका गित्ते यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनंजय शिवपुजे यांनी केले.
फॅबटेक मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाची जाण असणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर बिल्डिंग इन्फॉर्मेशन माॅडेलिंग आधारित रेवती सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने विद्यार्थी २ डी व ३ डी मॉडेलिंग, नकाशे, कट-सेक्शन व दृष्ये अचूकपणे तयार करू शकतात. यामुळे वेळ आणि खर्च वाचतो तसेच आर्किटेक्ट, अभियंते व बांधकाम व्यावसायिक यांच्यात सुसंवाद साधणे सोपे होते. रेवीट सॉफ्टवेअरचे ज्ञान विद्यार्थ्यांना उद्योगात अधिक संधी उपलब्ध करून देत त्यांच्या करिअरला भक्कम दिशा देते. म्हणून फॅबटेक इंजिनिअरींग काॅलेज च्या वतीने ५ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग परीश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी साक्षी कदम आणि कुमारी अनुष्का घोडके यांनी केले.