सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब व इनरव्हील क्लब सांगोला आयोजित डान्स स्पर्धेत विजय प्राप्त केला असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.
रोटरी क्लब एक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संस्था आहे, जी “सेवाभावी कार्यासाठी” कार्यरत आहे. सांगोला तालुक्यातील रोटरी क्लब व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्तविद्यमानाने घेण्यात आलेल्या डान्स स्पर्धेत फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील पहिली ते चौथी पहिला गट यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. द्वितीय गट पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिसरा गट आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करून विजय प्राप्त केला आहे.
रोटरी क्लब व इनरव्हील क्लब मान्यवरांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख स्वरूपात बक्षिस व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजयी विद्यार्थ्यांना शिक्षक अतिश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
डान्स स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, स्कूलच्या सीईओ सारिका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील आदींसह स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.