○ स्व. आम. गणपतराव देशमुख यांच्या ९८ जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेत विजय
सांगोला: प्रतिनिधी
स्व. आमदार डाॅ. भाई गणपतराव देशमुख यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षे मुले व्हाॅलीबाॅल (पासिंग) तालुकास्तरीय स्पर्धेत फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.
स्व. आमदार डाॅ. भाई गणपतराव देशमुख यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त एखतपूर (ता. सांगोला) येथे सोमवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत फॅबटेक पब्लिक स्कूल मधील १७वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, स्कूलच्या सीईओ सारिका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील आदींनी अभिनंदन केले.
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील हाॅलीबाॅल स्पर्धेतील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक पंचाक्षरी स्वामी व आरिफ तांबोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.