□ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ३.२६ लाख पॅकेजची नोकरी
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेले कुमार अजय राजाराम बिले यांची मुंबई येथील "ईगल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स प्रा.लि." कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली.
सन २००८ मध्ये नोंदणी केलेल्या "ईगल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स प्रा.लि." कंपनी हि जागतिक आयटी आणि बीपीओ पुरवठादार कंपनी आहे. उद्योगांमध्ये डिजिटल परिवर्तनास गतिशील बनविण्यासाठी "ईगल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स प्रा.लि." कंपनी मदत करते. अशा या कंपनीत फॅबटेक कॉलेज मधील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेतलेले पाचेगाव (बुद्रुक) ता. सांगोला येथील अजय राजाराम बिले यांची मुंबई येथील "ईगल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स प्रा.लि." कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे. कंपनीकडून वार्षिक ३.२६ लाख पॅकेज मिळाले आहे.
"ईगल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स प्रा.लि." कंपनीत निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेडंगे, उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. तानाजी धायगुडे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील प्लेसमेंट समन्वयक प्रा. आतिश जाधव आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.