□ सांगोला फॅबटेक मध्ये डाॅ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सांगोला: प्रतिनिधी
भारताला ग्रंथालय क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या डाॅ. रंगनाथन यांचा ग्रंथालय विकासात मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डाॅ. एस. आर. रंगनाथन यांनी रुजवला. एक प्रसिद्ध भारतीय ग्रंथपाल आणि माहिती शास्त्रज्ञ, यांनी भारतातील ग्रंथालय विज्ञानाच्या क्षेत्रात डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे भारतीय ग्रंथालयाच्या इतिहासातील चिरस्थायी व्यक्तीमत्व म्हणून डाॅ. एस. आर. रंगनाथन यांना ओळखले जात असल्याचे मत फॅबटेक मधील ग्रंथपाल सुधीर माळी यांनी व्यक्त केले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस सांगोला मध्ये मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रंथालयामध्ये डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन इंजिनिअरिंगचे प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, पाॅलिटेक्निक काॅलेजचे संवेदनाशील प्राचार्य तानाजी बुरूंगले, डाॅ.स्वाती लोकरे, कार्यालयीन अधिक्षक राजकुमार पाटील, चीफ अकाउंट सुनिल टाकळे आदींच्या हस्ते डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध पुस्तक कादंबरीचे स्टाॅल ग्रंथालयात वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कार्यक्रमात डाॅ. स्वाती लोकरे व प्रा. आशिष जोशी यांनी ग्रंथालय व ग्रंथपाल यांबद्दल उपस्थितांना संबोधित केले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये डाॅ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, उप-प्राचार्या डाॅ. विद्यारणी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. ज्योती शिंदे, स्टुडंट डिन प्रा. संजय पवार, प्रा. शरद आदलिंगे, गौरव जाधव, सविता भेरे, स्वाती इंगळे, दिलीप महाडिक, मनोज हत्तेकर, रविंद्र बिले, प्रितम खाडे, अजित ढुणे आदी उपस्थितीत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाॅलिटेक्निकचे ग्रंथपाल मोहन लिगाडे, स्वप्नील रूपनर, नेताजी मस्के आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.