सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेले आटपाडी (जि. सांगली) येथील कुमार सुशांत पिसे यांची "ऑटोमोटिव्ह रिसर्च ऑफ इंडिया" मध्ये निवड झाली असल्याची माहिती उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली.
भारतीय ऑटोमोटिव्ह संशोधन संस्था (एआरएआय), १९६६ मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. देशातील आघाडीची ऑटोमोटिव्ह आर अँड डी संस्था आहे. जी ऑटोमोटिव्ह उद्योगाने भारत सरकारच्या सहकार्याने स्थापन केली आहे. एआरएआय ही स्वायत्त संस्था आहे जी भारत सरकारच्या भारी उद्योग मंत्रालयाशी संबंधित आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारने एआरएआयला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था (एसआयआरओ) म्हणून मान्यता दिली आहे. एआरएआय ही भारत सरकारने केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९ च्या नियम १२६ अंतर्गत सूचित केलेली प्रमुख परीक्षण आणि प्रमाणन एजन्सी आहे. एआरएआय सुरक्षित, कमी प्रदूषण करणारे, अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह वाहनांची खात्री करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हि संस्था संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान विकास आणि ज्ञान उपक्रमांच्या क्षेत्रात सेवा आणि कौशल्य प्रदान करते. अशा कंपनीत सुशांत पिसे यांची निवड झाली असुन संस्थेकडून वार्षिक ३ लाख पॅकेज मिळणार आहे
"ऑटोमोटिव्ह रिसर्च ऑफ इंडिया" मध्ये निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेडंगे, उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. तानाजी धायगुडे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील प्लेसमेंट समन्वयक प्रा. आतिश जाधव आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.