सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी सांगोला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर- एफ. सी. क्रमांक ६९३७) ची ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध असुन या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. संजय बैस यांनी दिली.
फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी मध्ये बी फार्मसी प्रवेश प्रक्रिया हि दि. ७ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून हि ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रिया १४ जुलै २०२५ पर्यंत चालणार आहे.
याशिवाय फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून डी फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी पदवी प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज दि. ४ जुलै २०२५ पासून सुरुवात झाली असुन हि प्रक्रिया १६ जुलै २०२५ पर्यत चालणार आहे.
फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील एफ सी सेंटरवर विद्यार्थी व पालकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा सांगोला फॅबटेक काॅलेज कडे असल्याचे दिसून येते.
फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. संजय बैस यांच्या नेतृत्वाखालील उच्च शिक्षित प्राध्यापक अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आहेत. फॅबटेक कॉलेज मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेसाठी तसेच विद्यार्थ्यांना अचूक अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. हि समिती नियोजनबद्धपणे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडत आहेत. या प्रक्रियेला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे.
फॅबटेक संस्थेला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार मिळाला आहे. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचा गुणात्मक दर्जा उंचावण्याचे काम फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील शिक्षक करीत आहे. तणाव विरहित शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना फॅबटेक मध्ये मिळत असल्याने विद्यार्थी व पालकांचा सर्वाधिक ओढा फॅबटेक काॅलेज कडे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.