पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रोजेक्ट एक्जीबिशन आयोजित करण्यात आले होते. हे एक्झिबिशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये
प्रोजेक्ट एक्झिबिशनचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन कौशल्य आत्मसात करण्याची संधी या प्रोजेक्ट एक्झिबिशन माध्यमातून मिळाली. प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील २५० हून विद्यार्थ्यांनी या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग नोंदविला व विविध विषयावर प्रोजेक्ट सादर केले.
या कॉम्पिटिशन साठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. संपत देशमुख यांनी प्रोजेक्टचे मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन व त्यांचे अभिनंदन केले.
तसेच इतर क्षेत्रातील नोकरीच्या संधी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कार्यक्रमाप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य, डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, प्रा. शिवाजी पवार, प्रा. अभिजीत सवासे, डॉ. दीपक गाणमोटे, प्रा. संतोष बागल, प्रा. अतुल घोंगडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.