पंढरपूर सिंहगड मध्ये "यशस्वी उद्योजक कसे व्हायचे" या विषयावर व्याख्यान

 


पंढरपूर: प्रतिनिधी



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी अमरावती येथील स्टार्टअप इन काॅलेज मधील प्रशांत औटी यांचे "यशस्वी उद्योजक कसे व्हायचे" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजित करण्यात आलेल्या "यशस्वी उद्योजक कसे व्हायचे" या व्याख्यानामध्ये प्रशांत औटी यांचे महाविद्यालयाच्या वतीने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

   यावेळी बोलताना प्रशांत औटी म्हणाले, यशस्वी उद्योजक होण्यासाठी, बाजाराच्या गरजा ओळखून, व्यवहार्य व्यवसाय कल्पना विकसित करणे आवश्यक असते, याशिवाय तपशीलवार व्यवसाय योजना तयार कराव्या लागतात सुरक्षित निधी मिळवा आणि ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित करावे लागते. यशस्वी लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना असतात जर तुमच्या कल्पना जीर्ण झाल्या आणि जुन्या असतील तर शीर्षस्थानी राहण्याची संधी खूप कमी असते. आजकाल लोक सुशिक्षित आणि धूर्त आहेत की त्यांना एखाद्या गोष्टीकडे आकर्षित करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पहिली गोष्ट जी तुमच्या मनात असणे आवश्यक आहे ती एक वेगळी आणि आकर्षक कल्पना आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी बनवते. अशा स्पर्धात्मक बाजारपेठेत उभे राहणे आवश्यक आहे. अन्यथा, तुम्ही यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांच्या यादीमध्ये असाल असे मत प्रशांत औटी यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाराम राऊत यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.