सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारत देशाची राष्ट्रीय भाषा हिंदी भाषा आहे. भारत देशात वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेशभूषा, संस्कृती, खाद्यपदार्थ,विचारधारा वेगळी आहे. विविधतेने नटलेल्या भारत देशाला एकत्र हिंदी भाषा बांधून ठेवते. हिंदी दिनाच्या निमित्ताने स्कूलमध्ये असेम्ब्ली पूर्ण हिंदी भाषेतून विद्यार्थ्यांनी घेतली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दम्तगीर मुजावर सेवानिवृत्त शिक्षक, स्कूलचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, सुपरवायझर सौ वनिता बाबर हे लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन संत कबीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाविषयी अनुक्रमे सोहम सलगर, रुद्राणी ठोंबरे, ईश्वरी गायकवाड, आयुष जगताप, श्रेया जगताप, आचल येड्रावकर, सई बाबर, अदिती घाडगे, यांनी हिंदी दिनाचे महत्त्व व हिंदी ही पूर्ण भारत देशात बोलणारी एकमेव भाषा आहे हे सांगितले . तसेच इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी हिंदी मधून चौदाखडीचे कृतीयुक्त अध्ययन केले.
हिंदी दिनानिमित्त हिंदी भावगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते भावगीत स्पर्धेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांचे हस्ते प्रशस्तीपत्रक वितरित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री मुजावर सर यांनी घरातूनच विद्यार्थ्यांवर होणारे मूल्य व संस्कार सांगितले. तर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या विषयी बोधपर गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर ,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे ,स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दयानंद चांडोले सर यांनी केले तर आभार सौ सुप्रिया फुले यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.