□ वार्षिक ३ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड
पंढरपूर: प्रतिनीधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील ७ विद्यार्थ्यांची "फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स" या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. विनोदकुमार मोरे यांनी दिली.
"फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स" ही कंपनी जगभरातील बर्याच ऑटोमोटिव्ह ओईएमसाठी एक पसंतीचा भागीदार आहे. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सचे भारत, जर्मनी आणि हंगेरीमध्ये ६ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत आणि २५०० हून अधिक व्यक्तींच्या मजबूत टीमने हे चालविले आहे. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने ऑटोमोबाईल उद्योगासाठी बँकेचे भागीदार आणि समाधान प्रदाता म्हणून नावलौकिक मिळविला आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील ७ विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.
"फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स" या कंपनीत महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील दिनेश संतोष रंदवे, सोहेल तय्यब देशमुख, दिनकर सावता जाधव, मनोजकुमार बाळासाहेब लोकरे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विवेक विलास घाडगे, सचिन बाळू जधव आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील अथर्व नितिन येवले आदी ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ३ लाख पॅकेज मिळणार आहे.
"फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डाॅ. यशवंत पवार, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. वैभव गोडसे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.