पुणे: प्रतिनिधी
समाजव्यवस्थेत वावरत असताना अनेक अनुभव येत असतात. जीवन जगत असताना सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून जगणे आवश्यक असते. सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर असलेल्या रोजगार व स्वयंरोजगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ. मेघा हणमंत पवार यांच्या जागरूक वृत्तीमुळे एका निराधार माणसाला माणुसकीचा आधार मिळाल आहे.
रोजगार व स्वयंरोजगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ. मेघा हणमंत पवार ह्या दैनंदिन कामकाज उकरून राञी घरी परत असताना वालद पुल खळी बसस्थानक येथे एक अनोळखी इमस बसस्थानक निवासा सेड खाली अर्धवट कपड्यात मेघा पवार यांना दिला. यादरम्यान मेघा पवार यांनी तात्काळ गाडी उभा करून संबंधित नजिक असलेल्या पोलीस स्टेशनशी संपर्क करून सदर व्यक्तीची विचारपूस करून उपचार करण्यासंबंधी सुचना केल्या.
दरम्यान अनोळी इसम यांचे अंगावर अर्धवट कपडे होती. पाऊस चालू असल्याने तो इसम पावसात भिजून थंडीने कडकडत होत्या अशा वेळेस मेघा पवार यांनी आपल्या गाडीतील स्वत: ओढणी देऊन माणुसकी धर्म जोपासला. त्यांच्या या कार्याचे सर्वञ कौतुक व अभिनंदन होत आहे.