पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये ९ ऑगस्ट २०२४ रोजी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्बल स्किल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होती हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
साॅफ्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत
सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदणीला. या कार्यशाळेत प्रशिक्षक मोहन शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी राजाराम राऊत, अमोल नवले, संगीता कुलकर्णी, नवनाथ बनकर आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.