पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर मध्ये दरवर्षी नामांकित कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी प्रशिक्षण देण्यात येते अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली
सिंहगड कॉलेज मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी साॅफ्ट स्किलचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण श्रीकांत सुदंरगिरी यांच्या उपस्थितीत झाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी आवश्यक तयारी होणे करणे आवश्यक असते. याच दृष्टिकोनातून द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण २२ जुलै २०२४ ते २६ जुलै २०२४ या कालावधीत पूर्ण झाले.