कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये इंजिनिअरींग ला शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयाच्या वतीने पंढरपूर व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज कसा भरावा, प्रवेशासाठी लागणाऱ्या कागद पत्राची पडताळणी करून पूर्तता कशी करावी, इंजिनिअरींगच्या विविध शाखातून स्वतःच्या आवडीची शाखा कशी निवड करायची आणि स्वत:चा प्रवेश कसा निश्चीत करावा या सर्व गोष्टीची माहिती इंजिनिअरींगला प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना व्हावी. यासाठी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड कॉलेज मध्ये मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे.
प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली संभ्रम अवस्था व भीती दूर व्हावी यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग मार्गदर्शन करणार आहेत.
महाविद्यालयाने सुरु केलेल्या मोफत मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले आहे.