पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील अणुविद्यूत आणि दूरसंचार अभियांत्रीकी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. गणेश बसवराज बिराजदार यांनी कर्नाटकातील विश्वेश्वरैया टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी विद्यापीठातून पीएच. डी. प्राप्त केली असल्याची माहिती अणुविद्यूत आणि दूरसंचार अभियांत्रीकी विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
विश्वेश्वरैया टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव येथे " ब्रेन ॲबनॉर्मलिटी डिटेक्शन युजिंग इ. इ. जी. सिग्नल ॲनालिसीस " या विषयावर प्रा. गणेश बसवराज बिराजदार यांनी प्रबंध सादर केला.
कलबुर्गी येथील पूज्य दोडाप्पा आप्पा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. चन्नाप्पा भैरी , प्राचार्य डॉ. मिसे यांनी या प्रबंधासाठी मार्गदर्शन केले.
प्रा. गणेश बसवराज बिराजदार यांनी पीएच. डी. प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अणुविद्यूत आणि दूरसंचार अभियांत्रीकी विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.